प्रमुख फायदे....
● शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके आदी शेतीच्या कच्च्या मालाच्या खरेदीसाठी कर्ज दिले जाते. • शेतीसोबतच पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आदी
जोडधंदे करणारे शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कोणत्याही वेळी ठराविक कालवधीसाठी कर्ज मिळते.
• एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण मिळू शकते. • किसान क्रेडिट कार्ड हे एटीएममध्ये वापरता येते. यामुळे हवी
तेव्हा रक्कम काढता येते, तेही आपल्या सवडीनुसार. • हवी तेवढीच रक्कम गरजेनुसार काढल्याने, काढलेल्या रकमेनुसार व्याजाची आकारणी होते व त्यामुळे कमी व्याज भरावे लागते.
• रु. २५,००० पेक्षा जास्त पतमर्यादा असल्यास चेकबुकसुद्धा
मिळू शकते.
• प्रत्येक पिकावेळी कर्जाकरिता अर्ज करण्याची गरज भासत नाही..
• तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग चार्जेस) आकारले जात नाही.
• कार्डधारक वैयक्तिक खर्चासाठीही या कार्डचा वापर करू शकतो.
• शेतीच्या म्हणजेच पिकांच्या उत्पन्नावर, तसेच लागवडीखालील क्षेत्रावर आधारित कर्जाची मर्यादा ठरवली जाते..
• कर्जाची परतफेड पिकाच्या हंगामानुसार शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून करायची असते. अतिवृष्टी/ दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती काळात कर्जाची पुनर्रचना (रिशेड्युल्ड) केली जाते.
• किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले, तर त्याला ५० हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
• कार्डची वैधता पाच वर्षे असते.
धन्यवाद 🙏
0 Comments