Marathi news
मित्रांनो युट्यूब हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, त्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमावू शकता. युट्यूब हे जगामधील दुसऱ्या नंबर च सर्वात मोठं सर्च इंजिन प्लॅटफॉर्म आहे. गूगल नंतर सर्वात जास्त युट्यूब वर सर्च केलं जाते.
आजचा काळ तर व्हिडिओ चा काळ असं मानलं जात आहे. लोकांना आता व्हिडिओ च्या माध्यमातून माहिती बघायला आवडत आहे. आणि व्हिडिओ च्या मध्यमातून ती माहित लवकर समजते. त्यामुळे व्हिडिओ ची डिमांड खूप वाढली आहे.
या २ वर्षात (२०२०-२०२१) सर्वात जास्त युट्यूब चॅनेल बनवले गेले. कारण लॉकडाऊन मुळे लोक घरी होते आणि त्यांनी ऑनलाईन इनकम सोर्स म्हणून युट्यूब हा मार्ग निवडला. कारण हा एक सोपा मार्ग आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्या युट्यूब चॅनेल वर अपलोड करायचे असतात.
अपलोड केल्याला व्हिडिओ वर गूगल ads दाखवते आणि त्या ads चे पैसे आपल्या अकॉउंट मध्ये जमा होतात. जेवढे जास्त views तेवढी जास्त इनकम.
व्हिडिओ टाकताना काही गोष्टी योग्य रीतीने कराव्या लागतात. म्हणजेच तुम्हाला एका कॅटेगरी चे व्हिडिओ बनवणे आवश्यक असते. उदा. फिटनेस, ट्रॅव्हल, कूकिंग, डिजिटल मार्केटिंग, टेक्नॉलॉजी, कॉमेडी विडिओ, इत्यादी. यांसारख्या niche वर व्हिडिओ बनवू शकता.
तसेच तुम्हाला रेगुलर व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक असते. तुमचे १००० subscriber आणि ४ हजार तासाचा watch time पूर्ण व्हावा लागतो. त्यांनतरच तुमच चॅनेल Monetize होते.
मित्रांनो आता युट्यूब ला चांगलीच डिमांड आहे. तुम्हाला जर व्हिडिओ बनवायची आवड असेल तर नक्कीच तुम्ही युट्यूब चॅनेल चालू करून त्यामधून पैसे कमवू शकता.
तुम्हला जर युट्यूब मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर खालील लिंक वर क्लीक करा.

0 Comments