आत्मविश्वास कसा मिळवायचा हे आपण पायरी पायरीने समजून घेऊ. आत्मविश्वास का गमावतो याची कारण आपण समजून घेऊ.
कित्येक जणांमध्ये आत्मविश्वासाच्या अभावाचं एक मुख्य कारण आढळतं ते
म्हणजे, स्वतःला कमी समजणं. ज्या लोकांनी स्वतःला पूर्णपणे स्वीकारलेलं नसतं
त्यांच्यांमध्ये कमीपणाची भावना तयार होते. त्यासाठी स्वतःला स्वीकारायला हवं.
"पण स्वतःला स्वीकारायचं म्हणजे काय ?" तुम्ही जसे आहात, जेवढं तुमचं शिक्षण आहे, तुमच्या घरातील आजूबाजूचे लोक जसे आहेत, तुमच्यात जे गुण आहेत, तुम्ही जसे दिसता या सर्वांचा आहे तसा स्वीकार करणं. पण कित्येकांना याचा पूर्णपणे स्वीकार करताच येत नाही.
नाशिकमधील कार्यशाळेमध्ये मी समोर बसलेल्या पार्टिसिपन्टस्ना हा प्रश्न विचारला होता, की "या क्षणी तुम्ही आत्ता जसे आहात तसे तुम्हाला मुंबईतल्या सर्वांत उच्च अशा हॉटेलमध्ये पाठवलं. तिथे सिनेसृष्टीतील मोठमोठ्या नट-नट्या पार्टीसाठी हजर आहेत. तुम्ही त्या पार्टीत आत्ता गेलात तर किती आत्मविश्वासाने वावरू शकाल? ज्या आत्मविश्वासाने तुम्ही इथे वावरता, तुम्ही तुमच्या घरी वावरता, तुमच्या कामाच्या ठिकाणी वावरता तितकाच आत्मविश्वास तिथे असेल का तो कमी "असेल ?"
त्यावर कित्येक धक्कादायक उत्तरं आली. कित्येक जणांनी हे नमूद केलं, की'आम्हाला अशा ठिकाणी जायलाच नको वाटेल.' कित्येकांनी सांगितलं, 'आम्ही तिथे गेल्यानंतर सगळ्यांसमोर जाण्याऐवजी
आमचा कल असेल की कुठेतरी लपायचं आणि लांबून त्यांना बघायचं. ' संभरपैकी तिथे चौघेजण म्हणाले, की 'आम्ही पुढे जाऊन त्यांना शेकड करू." -
दृष्टीत
असं का झालं असेल? याचं कारण कित्येकांच्या मनात नको त्या शंका होत्या. 'माझं इंग्रजी चांगलं नाही', 'माझी वेषभूषा ठीक नाही', 'आज मी दाढी केलेली नहीं', 'माझा चेहरा त्यांच्यासमोर जाण्यासाठी योग्य नाही...' अशा अनेक गोष्टी. खरंतर तुमचा आत्मविश्वास, तुमचं व्यक्तिमत्व हे तुमच्या बाहेरील आवरणावर अवलंबून नसतं. कित्येकांनी स्वतःच्या शरीरालाच पूर्णपणे स्वीकारलेलं नसतं.
0 Comments