Ad Code

Responsive Advertisement

पिंपरी महापालिकेतील कोरोना घोटाळ्याची चौकशी का नाही; राष्ट्रवादीचा सवाल

 मुंबई महापालिकेतील कोरोना घोटाळ्याची चौकशीची मागणी भाजप करत आहे. दुसरीकडे कोटय़वधी रुपयांचा कोरोना घोटाळा झालेल्या आणि भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी - चिंचवडसह पुणे महापालिकेची मात्र चौकशी केली जात नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.

पिंपरी महापालिकेतील कोरोना घोटाळा हा अजबगजब नमूना आहे. एकही कोरोना रुग्ण दाखल नसताना भोसरीत कोरोना सेंटर चालकाने तब्बल सव्वातीन कोटी रुपयांचे बिल पिंपरी महापालिकेकडून उकळले. हा घोटाळा सिद्ध होऊनही कोणावरच कसलीच कारवाई का झाली नाही, असा सवालही गव्हाणे यांनी केला आहे.



पिंपरी - चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत असताना त्यांनी कोरोनाच नाही, तर इतरही क़ोटय़वधी रुपयांचे घोटाळे केलेले आहेत. त्याच्या चौकशीची मागणी अनेकदा करूनही ती केली जात नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पिंपरीतील कोरोना घोटाळा चौकशीची मागणी राष्ट्रवादीकडून केली जाणार आहे, असे गव्हाणे म्हणाले. भाजपने मुंबई महापालिकेतील कोरोना घोटाळ्याची ईडी चौकशी सुरु केल्याची चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे कोटय़कधी रुपयांचा कोरोना घोटाळा झालेल्या पिंपरी - चिंचवडसह पुणे महापालिकांची मात्र ही चौकशी लागलेली नाही हे गौडबंगाल आहे. पिंपरी महापालिकेतील कोरोना घोटाळा हा अजबगजब नमूना आहे. कारण एकही कोरोना रुग्ण दाखल नसताना, एकाही कोरोना रुग्णाकर उपचार न करताही भोसरीत कोरोना सेंटरचालकाने तब्बल सव्वातीन कोटी रुपयांचे बिल पिंपरी महापालिकेकडून उकळले आहे. हा घोटाळा सिद्ध होऊनही कोणावरच कसलीच कारवाई झालेली नाही.

मास्क खरेदीतही घोटाळा

मास्क खरेदीतही असाच मोठा घोटाळा झाला आहे. दीड कोटी रुपयांचे मास्क झोपडपट्टय़ांमध्ये वाटल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात त्याचे वाटप तेथे झालेले नाही. काही कोरोना सेंटर चालकांनी अव्वाच्या सव्वा दरआकारणी करून महापालिकेला लुटले. मढय़ावरचे लोणी खाल्ले. असे एक नाही, अनेक गैरप्रकार कोरोना काळात पिंपरी महापालिकेत झाले. पण, त्याची ना दखल घेतली ना चौकशी लागली. कोरोना काळात पिंपरी महापालिकेत भाजप सत्तेत असल्याने व या घोटाळ्यात त्यांचाही सहभाग असल्याने या प्रकरणांची चौकशी केली जात नाही, असा आरोपही गव्हाणे यांनी केला आहे.


Post a Comment

0 Comments