Ad Code

Responsive Advertisement

यशाची गुरूकिल्ली

 यशाची गुरूकिल्ली



निरंतरता ही खरंतर यशाची गुरूकिल्ली आहे. आपण ज्या वेळी कार्य करतो आणि जर ते मध्येच सोडून टाकलं तर जिथे आहे तिथेच कार्य थांबतं. विरोध असतानाही, कुणी मदत करत नाही अशा अवस्थेतही, तुमच्या कामाची चेष्टा होत असतानाही, अशा वातावरणातही निरंतरतेने काम करायला लागता त्या वेळेला तुमची निरंतरता तुम्हाला यशापर्यंत पोहोचवते. तुमची जिद्द, तुमची चिकाटी तुम्हाला यशापर्यंत पोहोचवते.

जर एक वृद्ध गृहस्थ डोंगर पोखरू शकतो तर कोणत्याही कार्यात आपल्याला नक्की यश मिळू शकते. फक्त निरंतरतेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळेस तुमच्या आतमध्ये, 'हे कार्य मी पूर्ण करणार आहे' हा दृढ विश्वास असतो, निश्चय असतो त्या वेळेस विरोधसुद्धा मागे हटतात.

चांगल्या कामाला विरोध होणार हा अनुभव अनेकांना असतो. याचं एक बोलकं उदाहरण मी पाहिलेलं आहे. पुण्यापासून दोनशे किलोमीटरवर एका लहानशा खेडेगावात एक मुलगी शिकत होती. सातवीपर्यंत तिला चांगले मार्क्स मिळाले. तिच्या शिक्षकांनी सांगितलं, की 'तिला पुढे शिकू देत. ' पण घरातले मात्र म्हणाले, की 'पुढे शिकून काय उपयोग ?' तिचे मोठे चुलतेहोते, त्यांनी पूर्ण विरोध केला. पण या मुलीने ठरवलं, की 'मला शिकायचंच आहे.' तिने लांबच्या शाळेत जाऊन दहावी पूर्ण केली. दहावी पूर्ण केल्यानंतर छोट्या शहरात जाऊन अकरावी-बारावी पूर्ण केलं. पण अकारावी-बारावीच्या पुढचं शिक्षण त्या शहरात उपलब्ध नव्हतं. त्या वेळेस पुण्याला यायचं ठरलं.

दोनशे किलोमीटर दूर पुण्यात एकटं राहायचं, याला त्यांच्या घरातून पूर्ण विरोध झाला. तिचे वडील, तिचे काका, तिचे मोठे भाऊ, सर्व तिच्या विरोधात उभे राहिले. पण ही मुलगी मात्र स्वतःच्या निर्णयावर ठाम होती. तिने निक्षून सांगितलं, की 'मला शिकायचं आहे. ती स्वतःच्या गुरुजींकडे गेली. गुरुजींनी तिची पुण्यात व्यवस्था ती करून दिली. घरातून निघताना या मुलीशी कोणीही बोललं नाही. 'पण मी शिकणार', या एकाच जिद्दीने ही मुलगी पुण्यात आली. लहानशा केलेल्या व्यवस्थेमध्ये, राहायच्या ठिकाणामध्ये ही राहायला लागली. जवळच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळाली होती. प्रत्येक वर्षी प्रथम वर्गात पास होत तिने आपली डिग्री पूर्ण केली आणि ज्या वेळेस तिने आपली डिग्री पूर्ण केली आणि परत आपल्या गावी गेली त्या वेळेला तिच्या वडिलांच्या, काकाच्या डोळ्यात पाणी आलं.

तीन वर्षं या मुलीने निश्चय करून, विरोध असतानाही ठामपणे आपली पावलं टाकली. या मुलीमध्ये हा आत्मविश्वास कुठून आला ? हा दृढनिश्चय कुठून आला ? हा प्रश्न मला पडला. त्या वेळेस लक्षात आलं, की तिच्या गावच्या शाळेतील शिक्षकांनी तिच्या मनात हा आत्मविश्वास भरला. हे शिक्षक दर आठ दिवसांनी हिला पत्र पाठवायचे, फोन करायचे. 'तू करू शकशील', हा एक विचार त्यांनी तिच्या मनात पक्का भरला. तो विचारच तिला तिचा दृढनिश्चय करण्यासाठी क्रमप्राप्त होऊन गेला.

आत्मविश्वासाने कार्य करताना तुमच्या आत्मविश्वासामुळे समोरच्याच्या मनातही ७००० आत्मसात करायला तुम्ही कारणीभूत ठरता. समोरच्याच्या मनात हे

आहे. हे घडणं शक्य आहे. '

Post a Comment

0 Comments